Thursday, November 18, 2010

एक कविता

संध्याकाळच्या  उतरत्या
सावल्या
पारदर्शी  पदरातून झिरपत
दंडावर पडलेलं
थकलं जांभळं ऊन.

तुझ्या माझ्यामधे
निस्तब्ध क्षण
अवघडून साकळलेला.

निसटून जाण्याची भीती
की सुटके आधीची
अधिरता?

आणि अचानक
हलकेच उडत आलेलं
भेळेचं खरकटं
रिकामं पान.

ते आलं म्हणून -


आनंद थत्ते
अनुष्टुभ --- दिवाळी १९९२