Friday, October 12, 2012

शब्द

 
 
मीच उच्चारलेले
निरोपाचे
सांत्वनेचे
अभिनंदनाचे
धीर देणारे
शब्द
मलाच खोटे वाटू लागले
तेंव्हा मी
या जगात
जगायला
लायक
झालो.


आनंद थत्ते
१२.०९.२०१२

बंद दरवाजा ३

 
 रक्तातून
अक्षरं वाहत होती
शब्द झाले
लडबडले
गुंतले
पुढे
बंद दरवाजा
दाब वाढत गेला
Died of
hemorrhage!

आनंद थत्ते
१२.०८.२०१२

बंद दरवाजा २


एक एक
दरवाजा
आत आत
बंद होतोय
आणि
निळ्या समुद्रावर
लाल शिडाची
शुभ्र होडी
प्रवासाला
निघालीए.


आनंद थत्ते
०७.०८.२०१२

बंद दरवाजा १


 बंद दरवाजा
आत
मी
बाहेर
तू
अनंत काळ
बंद दरवाजा .


आनंद थत्ते
०७.०८.२०१२
 

आनंद!


मागचं आठवायचा खूप प्रयत्न केला
पण काही आठवतंच नाही .
इतकी वर्ष अशीच कोरडी गेली म्हणायचं ?
तर ती आनंदात गेली असंच जाणवतंय
श्रीशिल्लक शून्यच.
आनंद आहे .

आनंद थत्ते

२४.०५.२०१२
 

बोच


केंव्हा तरी
माझ्या अस्तित्वाचा
खडा तुला बोचणारच होता.
मग चिमटीत पकडून तू
त्याला फेकून दिलंस.
मला वाटतं
तेंव्हा पासून
मी निबर होत गेलो


आनंद थत्ते
22.05.2012

उगीचच-


उगीचच
वाचल्या
तुझ्या
कविता.
वाटलं
होतं
तू
भेटशील.
पण
मीच
दिसलो.


आनंद थत्ते.
०८.०५.२०१२